संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

पालकांच्या खिशाला कात्री! स्कूल बसची तब्बल ३० टक्के भाडेवाढ होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर आता शाळादेखील हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. असे असले तरी आता पालकांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. डिझेल दरवाढ कर्मचाऱ्यांचे वाढते पगार आणि 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असताना आता स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ करण्याचे स्कूल बस मालक संघटनेने ठरवले आहे.

24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा 10 फेब्रुवारीपासून पूर्णपणे सुरू होत आहेत. राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षांचा रोड टॅक्स जरी माफ केला असला तरी वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असल्याने 30 टक्के भाडे वाढ करणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने असल्याचे सांगितले.

‘स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मागील दोन वर्षांपासून बस बंद होत्या त्यामुळे मेंटेनन्स खर्च, कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बस मालकांनी शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.’ अस स्कूल बस मालक संघटनेचे सचिव रमेश मनियन यांनी सांगितले.

त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांना स्कूल बसने शाळेत पाठवायला सुरू करणार असाल तर तुम्हाला 30 टक्के अधिकचा शुल्क मोजावे लागणार आहे. राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. मागील दोन वर्षापासून या स्कूल बस अनेक ठिकाणी बंद आहेत. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मेंटेनन्स खर्च कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बसने शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami