संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पालघरच्या ७ जणांसह १६ खलाशांना पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेतले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करत असल्याच्या आरोपावरून पाकिस्तान लष्कराच्या जवानांनी १६ भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतले आहे. त्यात पालघरमधील ७ जणांचा समावेश आहे. या मच्छीमारांच्या २ बोटीही पाकिस्तानच्या सैनिकांनी जप्त केल्या आहेत. मंगळवारी ही कारवाई केली, अशी माहिती पाकिस्तान सागरी सुरक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर २ बोटींमधील १६ मच्छीमार मासेमारी करत होते. त्यांनी पाकिस्तान सागरी हद्दीचे आणि संयुक्त राष्ट्राच्या कायद्याचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या सैनिकांनी या १६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या २ बोटीही जप्त केल्या. पाकिस्तान लष्कराने मंगळवारी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या १६ मच्छीमारांमध्ये पालघरच्या ७ खलाशांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना कराचीला नेले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना डॉक्स पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे. जहाज, विमान आणि मासेमारांच्या नौकांनी पाकिस्तानी हद्दीत घुसखोरी करू नये यासाठी पाकिस्तान सैन्य दलाचे जवान समुद्रात गस्त घालतात. त्यांची गस्त सुरू असताना १६ भारतीय मच्छीमारांनी सागरी हद्दीचे उल्लंघन करून पाकिस्तान सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी केल्याचा आरोप आहे. त्यात पालघरमधील ७ जणांचा समावेश आहे. डहाणू, तलासरी, विक्रमगड या पालघरच्या दुर्गम भागातील नागरिक गुजरातमधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. त्यातील हे ७ जण आहेत. यापूर्वीही पालघरच्या खलाशांना पाकिस्तानने पकडले होते. मात्र तत्कालीन दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami