संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पालघरमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या आमदाराच्या बहिणीचा पराभव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर- महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे एकमेव आमदार असलेले आणि पत्र्याच्या घरात राहत साधेपणाने जगणारे विनोद निकोले यांच्या बहिणीचा उर्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याची निराशजनक घटना घडली आहे.आमदार विनोद निकोले यांच्या बहिण विद्या निकोले यांचा अपक्ष उमेदवार अनुसया अनंता गुहे यांनी ६० पेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आहे.

आमदार विनोद निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघातून माकपचे एकमेव कॉम्रेड आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता.त्यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांचा ४ हजाराहून अधिक मताने पराभव केला आहे.ते पत्र्याच्या घरात राहत असून आपल्या साध्या राहणीसाठी सर्वाना परिचित आहेत.ते सर्वात गरीब आमदार असल्याचे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. अशी साधी राहणी असणाऱ्या आमदाराच्या बहिणीला मात्र ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे सरपंच बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.भाऊ आमदार असतानाही त्यांचा पराभव झाल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami