संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पालघरमध्ये टेम्पोची ट्रकला धडक
अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाटाजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीत ही दोन्ही वाहने जळून खाक झाली. अपघातात टेम्पो चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी मनोरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून टेम्पो मुंबईकडे जात होता. तर मक्याच्या पिठाचा ट्रक गुजरातकडे निघाला होता. ही दोन्ही वाहने मेंढवण घाटाजवळ आली तेव्हा टेम्पोने ट्रकला धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. त्यात ती जळून बेचिराख झाली. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र टेम्पो चालक जखमी झाला. त्याला मनोरे येतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आता ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami