मुंबई – पालघर आणि नाशिकला आज पहाटे भूकंपाचे हादरे जाणवले. पालघरच्या डहाणू आणि तलासरीला आज पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल होती. नाशिकमध्येही आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. त्याचीही तीव्रता ३.६ रिश्टर स्केल होती. या भूकंपांत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
नाशिकला आज पहाटे ४ च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. ३.६ रिश्टर स्केल या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ८९ किलोमीटर पश्चिमेला जमिनीखाली ५ किलोमीटर खोल होता. नाशिकनंतर पालघरलाही भूकंपाचा हादरा बसला. पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी तलासरी आणि डहाणूला भूकंपाचा हदरा जाणवला. ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. त्यामुळे नागरिक पहाटे खडबडून जागे झाले. मात्र या दोन्ही भूकंपांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.