संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! यंदा 50 हजार रुपये बोनस मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 58 कोटी रुपयांचा बोनस यावर्षी वाटणार आहेत. त्यामुळे किमान पन्नास हजार ते कमाल अडीच लाख रुपये बोनस प्रत्येक कर्मचारी,अधिकाऱ्याला मिळणार आहे. त्यात आयएएस अधिकारी पालिका आयुक्त यांचा सुद्धा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी डबल गोड करणारी पिंपरी ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.

यावर्षीच्या या बोनसपोटी पालिका तिजोरीला ५८ कोटींचा खड्डा पडणार आहे. दरवर्षी तो देण्याचा पाच वर्षासाठी करारच करण्यात आला आहे. म्हणजे २०२०-२१ ते २०२४-२५ अशा पाच वर्षात तीनशे कोटी रुपये बोनसवर खर्च होणार आहेत. यावेळी सेवेतील कर्मचारी,अधिकारीच नाही, तर वर्षभरात निलंबित झालेले आणि सेवानिवृत्ती घेतलेल्यांनी तो दिला जाणार आहे. या वर्षात सेवा समाप्त केलेल्यांना तसेच मृत्यू पावलेल्या पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे. बोनस दिवाळीपूर्वीच वाटण्यात येणार आहे,यासंदर्भातील आदेश पालिका आयुक्त शेखरसिंह यांनी काढला.आता कायद्याने कामगारांना बोनस देता येत नाही, त्यातून पळवाट काढून सानुग्रह अनुदान या नावाने आता बोनस दिला जात आहे वा घेतला जात आहे. उत्पादक म्हणजे उद्योगातील कामगारांच्या जोडीने इतर म्हणजे सरकारी,बिगरसरकारी कर्मचारी,अधिकारीही तो घेत आहेत. पिंपरी पालिकेचे लाखात पगार घेणारे आयुक्त,अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता,कार्यकारी अभियंता व वरिष्ठ डॉक्टर हे सुद्धा बोनस घेत आहेत.कोरोना काळातही पालिकेने आपल्या साडेसात हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एक पगार अधिक वीस हजार रुपये जादा रक्कम असा दिवाळी बोनस दिला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami