मुंबई – गेल्या वर्षी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून क्लीन चिट मिळालेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यात एनसीबीने जप्त केलेले पासपोर्ट परत देण्यात यावे, अशी मागणी आर्यन खान याने केली आहे. त्याच्या अर्जावर 13 जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने एनसीबीला दिले आहेत. आर्यन खानने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी एनसीबीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.