पिंपरी- पिंपरी चिंचवड मधील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावले आहेत. पिंपळे निलख भागातील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी शहरात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावल्याने शहरभर चर्चा सुरू झाल्या आहेत.
सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि या कंपनी मालकाने बनावट प्रमाणपत्रे दाखल केल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केल्या नंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. तात्काळ त्या ठेकेदार आणि कंपनी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच संदर्भात त्यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स शहरात विविध ठिकाणी लावलेत. दादा, तुमचे खूप आभार !आपण आज दाखवून दिले जे चुकीचे आहे,ते चुकीचेच आहे.भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे, मग भ्रष्टाचारी कोणी का असेना.