संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

पीएफआयच्या बंदला हिंसक वळण! तिरुवनंतपुरम, कोयट्टममध्ये तोडफोड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तिरुवनंतपुरम- एनआयएने काल देशातील 15 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय)93 ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर पीएफआयने शुक्रवारी केरळ बंदची हाक दिली होती. मात्र आज या बंदला पीफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंसक वळण दिले. राजधानी तिरुवनंतपुरम आणि कोयट्टममध्ये कार्यकर्त्यांनी सरकारी बस आणि वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे तेथे परिसरात एकच गोंधळ उडाला. कोल्लममध्ये मोटारसायकलवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी दोन पोलिसांवर हल्ला केल्यानंतर राज्य सरकारने पोलीस दलाची अतिरिक्त तैनाती केली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने एनआयएच्या नेतृत्वाखाली विविध एजन्सींनी गुरुवारी त्यांची कार्यालये, नेत्यांची घरे आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यांचा निषेध करण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी केरळ बंदची हाक दिली. तिरुवनंतपुरममध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तेथील कार आणि ऑटो रिक्षाची तोडफोड करत जोरदार गोंधळ घातला. वायनाड जिल्ह्यातील पनारामम गावात केरळ राज्य परिवहन (केएनआरटीसी )महामंडळाच्या बसेसवर पीएफआय समर्थकांनी दगडफेक केली. तसेच कोझिकोड, कोची, अलाप्पुझा आणि कोल्लममघ्ये केएनआरटीसीच्या बसेसवरही हल्ले झाले आहेत. कोझिकोड आणि कन्नूर येथे पीएफआय समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत 15 वर्षीय मुलगी आणि एक रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला, तर तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये भाजपच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. या संपूर्ण घटनेनंतर भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami