संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

पीएमपी ई- बस डेपोचे आज उद्घाटन होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पुणे स्थानकाजवळील ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्धाटन होणार आहे. यावेळी 90 ई-बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असतील. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे हे यावेळी उपस्थित असतील. पुणे स्टेशन ई-बस डेपोतून 15 विविध मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या मार्गावर या बसेस धावतील. त्यामुळे चाकरमान्यांना आणि सर्वसामान्य पुणेकरांना सुविधा मिळणार आहेत. केंद्र सरकारने पुण्यासाठी 150 ई बसेसची भेट दिली आहे. त्यापैकी 90 बसेसचा लोकार्पण सोहळा होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami