दिल्ली – पीएम किसान योजनेत सामील असलेले जे शेतकरी या योजनेच्या अटी व शर्थींची पूर्तता न करताच या योजनेचा लाभ घेत आहेत अशांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच अशा अपात्र शेतकर्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे.या योजने अंतर्गत पात्र शेतकर्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये सरकार जमा करते आणि 3 हप्त्यात 4 हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम दिली जाते. या योजनेसाठी कुटुंबातील एकाच व्यक्ती पत्र ठरू शकतो ज्या लोकांचे मासिक उत्पन्न अधिक आहे जे उत्पन्न कराच्या कक्षेत येतात असणं या योजनेचा लाभ मिळत नाही. ज्यांच्याकडे वडिलोपार्जित अधिक जमीन आहे असणं या योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच ज्यांची 10 हजाराहून अधिक पेन्शन आहे अशानाही या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा प्रकारच्या अति असतानाही काही लोकांनी या अटींचा भंग करून बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ घेतला अशांवर आता कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून या योजने अंतर्गत लाभार्थी बनून ज्यांनी सरकारकडून पैसे घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या कडून या योजने अंतर्गत घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहेत त्यामुळे पी एम किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.