नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आज पहाटे ५.५९ वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्रातील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही – सी ५२) यशस्वी प्रक्षेपित केले. इस्त्रोचे हे २०२२ मधील पहिलेच अंतराळ प्रक्षेपण होते.
इस्त्रोचे नवे अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिलीच अंतराळ मोहीम होती. यामध्ये इओएस-०४ रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, वनसंपदा आणि वृक्षारोपण, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान,पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत. इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यात आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत. हे पहिलेच मिशन यशस्वी फत्ते झाल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.पीएसएलव्ही- सी ५२ च्या अनुसार पर्यवेक्षण उपग्रह ( इओएस ) – ०४ अंतराळात पाठवण्यात आले. इस्त्रोने याची माहिती यापूर्वी दिली होती. या मोहिमेचे प्रक्षेपण इस्त्रोच्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.
भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या माहितीनुसार या यशस्वी मोहिमेमुळे इतर योजनांना फायदा होईल याशिवाय येत्या काळात चंद्रयान ३ आणि गगनयान यासह १९ सॅटेलाईट आगामी काळात लाँच करण्यात येणार आहेत. इस्त्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारताकडून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणाद्वारे (इ ओ एस ५०४ ) आणि इतर दोन छोटे सॅटेलाईट यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले असून ते अंतराळात अंदाजित ठिकाणी स्थापित झाले आहेत.पीसीएलव्ही – सी ५२ चे अंतराळात यशस्वी उड्डाण श्रीहरीकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या करण्यात आले. श्रीहरिकोटा मधून आज सकाळी ५२९ किमी उंचीच्या सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत उपग्रहाचे उड्डाण झाले.