अयोध्या – अयोध्या नगरीतील श्री प्रभू रामाच्या भव्य मंदिराचे काम आता ७० टक्के पूर्ण झाले असून वर्षभरात उर्वरित काम वेगाने चालूच राहील. मात्र साधारण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यातील तिसर्या आठवड्यात हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी दिली आहे.
स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी असेही सांगितले की, रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापित झाल्यानंतर जानेवारी महिन्यातील तिसर्या आठवड्यात मुख्य मंदिराचा भाग भाविकांना दर्शनासाठी खुला केला जाईल.भाविकांसाठी दर्शनी भाग खुला केला तरी उर्वरित काम पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहणार आहे. बाह्य समृद्धी आणि आंतरिक शांती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.खरे तर अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्रच चालत असते. सध्या भारत पुनरुत्थानाच्या मार्गावर आहे. त्यामुळे जगाचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हा बदललेला भारत प्रगतीच्या मार्गावर चालला असून ही एक सांस्कृतिक क्रांती आहे,असे गोविंद देव गिरिजी महाराज यांनी म्हटले आहे.