संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पुढील संपूर्ण वर्ष जगासाठी आर्थिक मंदीचे! प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुबीनी यांचा गंभीर इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन – महासत्ता असणारा अमेरिका देश आर्थिकदृष्ट्या डबघाईला येऊ लागल्यानंतर आता संपूर्ण जगालाच हा संसर्ग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील संपूर्ण वर्ष
जगाला आर्थिक खाईत लोटणारे ठरणार असल्याचा इशारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांनी दिला आहे.रुबिनी यांनीच २००८ साली जागतिक मंदीबाबत अचूक भाकित केले होते. त्यामुळे यावेळी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे जगभरातील सरकार आणि प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांनीच आता हा नवा आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला आहे.

रुबिनी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे.त्यांच्यामते, २०२१ च्या अखेरीपासून २०१३ च्या अखेरीपर्यंतचा काळ हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा ठरू शकतो.चालू वर्षाच्या शेवटपर्यंत अमेरिका आणि जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये दीर्घकाळ चालणारी आणि भीषण अशी आर्थिक मंदी येऊ शकते. आर्थिक संकटाचा हा काळ तब्बल वर्षभर म्हणजे २०२३च्या अखेरपर्यंत चालू राहू शकतो.याचा मोठा परिणाम एसअँडपी ५०० वरही दिसून येईल. साध्या मंदीमध्येही एसअँडपी ५०० तब्बल ३० टक्क्यांनी घसरू शकते. शेअर बाजारात ४० टक्के घसरण दिसू शकते, असे भाकित रुबिनी यांनी केले आहे.

२००७ ते २००८ या काळातील आर्थिक संकटांचे अचूक भाकित केल्यामुळे नॉरियल रुबिनी यांचे नाव ‘डॉक्टर डूम’ असे पडले. या आर्थिक संकटाला गांभीर्याने न घेणाऱ्यांना त्यांनी इशाराही दिला आहे. ज्यांना या आर्थिक मंदीचा फटका फारसा बसणार नाही असे वाटतेय, त्यांनी वेगवेगळ्या सरकारांवर आणि कॉर्पोरेशन्सवर असलेल्या कर्जाचा भार एकदा पाहावा,असे ते म्हणाले आहेत. जसजसे कर्जदर वाढतील तसतसा त्याचा संस्थांना, जनसामान्यांना,कॉर्पोरेट क्षेत्राला बँकांना फटका बसू लागेल”, असे ते म्हणाले. दरम्यान, रुबिनी यांनी अमेरिकेत महागाईचा दर कमी करणे अशक्य होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. कठोर निर्णय न घेतल्यास महागाईचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं लक्ष्य गाठणे ही अशक्यप्राय गोष्ट असेल, असे ते म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami