अहमदनगर – पिकांना हमीभाव मिळत नसल्याने आज सलग दुसर्या दिवशी अहमदनगरच्या पुणतांब्यात शेतकर्यांनी आपल्या आंदोलनाची मसाल पेटतीच ठेवली होती. आंदोलनस्थळी शेतकर्यांनी मोफत फळाचे वाटप करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आजही भेट घेण्यासाठी सरकार अधिकारी किंरा कोणताही मंत्री आला नसल्याने शेतकर्यांनी संताप वयक्त केला.
याच गावातून पाच वर्षांपूर्वी शेतकरी संपाची हाक देण्यात आली होती. त्यावेळी आंदोलन राज्यभर गाजले होते. यावर्षी ऊस अतिरिक्त झाला. पावसाळा तोंडावर आला तरी काही प्रमाणात शेतात ऊस उभा आहे. या उसाला हेक्टरी दोन लाख रुपये अनुदान मिळावे, शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे, दुधाला हमी भाव द्यावा, तसेच गहू-कांद्याची बंद असलेली निर्यात सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकरी धरणे आंदोलन करण्यात आहेत.
सात आंदोलकांना राहाता तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी नोटीस दिली आहे. तीत म्हटले आहे, की आंदोलनामुळे मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसे झाल्यास जबाबदारी सर्वस्वी तुमच्यावर राहील. पोलिसांनी नोटीस दिल्याने आंदोलक चांगलेच संतापले होते.