संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

पुणेकरांच्या खिशाला कात्री
सीएनजी दरात पुन्हा वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे :पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजीकडे वळवला आहे. मात्र सध्या परिस्थिती पाहता महागाईचा भडका हा सर्वच बाजूंनी वाढत असताना आता पुन्हा एकदा सीएनजी दरात वाढ झाल्याने पुणेकरांना महागाईची आणखी एक झळ बसणार आहे. पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी दरात प्रति किलो एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
मागील महिन्यातच सीएनजी गॅसच्या दरात चार रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक रुपयाची दरवाढ करण्यात आल्याने दोन महिन्यात पाच रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.आज झालेल्या दरवाढीनंतर सीएनजीच्या दराने डिझेलचा दर गाठला आहे. त्यामुळे सीएनजी धारक वाहकाच्या खिशाला कात्री बसणार आहे. आजपासून सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी ९२ रुपये मोजावे लागणार आहेत.
पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सातत्यानं होणाऱ्या या वाढीमुळं पेट्रोल – डिझेलच्या दरात आणि सीएनजीच्या दरात जास्त अंतर राहिलेले नाही. त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना याचा अधिक फटका बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami