संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पुणे आनंदनगर एसआरए रद्द विकसकावर कारवाईची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुण्याच्या बिबवेवाडीतील गंगाधाम चौकाजवळच्या आनंद नगर झोपडपट्टीची एसआरए योजना रद्द झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या झोपडीवासींनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित विकसक आणि एसआरए अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदाराने शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप या नागरिकांनी केला होता. त्यामुळे तेथे तीव्र संघर्षाची शक्यता आहे.
बिबवेवाडीतील आनंदनगर झोपडपट्टी ३५ ते ४० वर्षांची जुनी आहे. येथील काही नागरिकांचे हिलटॉप हिलस्लोप येथे अनधिकृत इमारतींमध्ये पुनर्वसन सुरू आहे. त्या बेकायचा इमारती असल्याने झोपडीवासीयांचे आनंद नगर येथे एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार होते. १४ वर्षांपूर्वी ही प्रक्रीया सुरू झाली. स्टार कन्स्ट्रक्शनचे विकसक राकेश शर्मा हे काम करणार होते. मात्र काही दिवसांपासून एसआरएच्या हालचाली थंडावल्या आहेत. त्याची माहिती त्यांनी आनंद नगर झोपडीवासींना दिलेली नाही. २००२ पासून ते पत्र व्यवहार करत आहे. यात विकास राकेश शर्मा आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. काही दिवसांपूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी पोलिस आयुक्तांना केलेल्या ऑनलाईन तक्रारीत केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami