संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

पुणे निवडणुकीत प्रभाग रचनेनंतरच आघाडीबाबत अंतिम निर्णय घेणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे महापालिका निवडणुकांसंदर्भात प्रा-रूप प्रभागरचनेवरील हरकती, सूचना होऊन अंतिम चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आघाडीबाबत निर्णय घेतला जाणार नाही. तसेच स्थानिक पातळीवर कितीही चर्चा झाली, विचार मांडले गेले, तरी वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, प्रभाग पद्धतीत कोणाला आक्षेप असतील तर हरकती-सूचना द्याव्यात. पुण्यात काहीही चर्चा होतात. भाजपा, राष्ट्रवादी यांना सोयीस्कर असे काही केलेले नाही. कोणत्याही पक्षाला आक्षेप असेल त्यांनी हरकती नोंदवाव्यात. पुण्यात काहीजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आणि प्रभागरचनेवरून नाराज असलेले काहीजण राष्ट्रवादीला रामराम करणार, अशी चर्चा मीही ऐकली आहे. त्यामुळे आता कोण येणार आणि कोण जाणार यावर मीदेखील लक्ष ठेवून आहे, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवडच्या कार्यकारिणीत मला पूर्वीच बदल करायचे होते. मात्र, ते शक्‍य झाले नाही. त्यामुळे आता नवी कार्यकारिणी देण्यात आली आहे, असेही पवार म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami