संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

पुणे, पिंपरीचे जम्बो कोविड सेंटर उद्यापासून बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाची रुग्णवाढ घटली आहे. त्यामुळे उद्या, सोमवारी २८ फेब्रुवारीपासून पुणे आणि पिंपरी येथील दोन्ही जम्बो कोविड रुग्णालये बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय २ मार्चपासून पुणे जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय झाला, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या व आतापर्यंत झालेले आणि सुरू असलेले लसीकरण याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख सरकारी अधिकारी उपस्थित होते. त्यात घेतलेल्या निर्णयानुसार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम या दोन्ही ठिकाणची जम्बो कोविड रुग्णालये बंद करण्यात येणार आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजचे मैदान पुन्हा पूर्वीसारखे करून द्या, असा आदेशही पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुण्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. ती लक्षात घेऊन ही २ जम्बो कोविड सेंटर तयार केली होती. परंतु आता कोरोनाची रुग्णवाढ आटोक्यात आली असल्यामुळे आणि रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे ही दोन्ही कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, उद्या सोमवारपासून ती बंद केली जाणार आहेत. तर जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळाही २ मार्चपासून सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami