संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

पुणे-मिरज आणि बारामती- लोणंद रेल्वे मार्गासाठी १५० एकर भूसंपादन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- जिल्हा प्रशासनाने पुणे-मिरज आणि बारामती – लोणंद या दोन रेल्वेमार्गांसाठी मागील चार महिन्यांत २५० एकर भूसंपादन केले आहे. आत्तापर्यंत एकूण २३३ एकर भूसंपादन झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या खरेदीसाठी २३८ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातील ११२ कोटी खरेदीसाठी खर्च झाले आहेत, तर उर्वरित २३३ एकर जमीन खरेदीसाठी शिल्लक असलेला १२६ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दर देण्यात आला आहे.बारामती-फलटण-लोणंद नवीन एकेरी रेल्वे मार्गांची लांबी ६३.६५ किमी असून, त्यापैकी ३७.२० किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या तालुक्यातील १३ गावांमधील खासगी भूसंपादन केले जात आहे. या जमिनींचे दर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवले आहेत. प्रकल्पासाठी ४३८ एकरपैकी २०५ एकर जमीन थेट खरेदीने संपादित झाली आहे. पुणे-मिरज या ब्राॅडगेज लाईनसाठी जिल्ह्यातील आतापर्यंत २८ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami