पुणे – पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील तब्बल 478 वाड्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर पावसाळ्याच्या आधी शहरातील जे अतिधोकादायक वाडे आहे अशा एकूण 38 हून अधिक वाडे हे पाडण्यात आले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पुणे शहरातील जवळपास 478 धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. ज्यांना पुणे महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आले आहेत.
शासनाच्या नियमानुसार सी1, सी2 आणि सी3 अशा 3 भाग करण्यात आले होते. सी1 मध्ये जे अतिधोकादायक 28 वाडे होते. त्यासर्व वाडे हे पाडण्यात आले आहे. तर सी 2 मध्ये 316 वाडे होते. त्यामधील जे 11 अतिधोकादायक वाडे होते. ते देखील पाडण्यात आले आहे. सी 3 मधील 134 वाड्यापैकी 9 वाडे हे पाडण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने यंदाच्या पाऊसाच्या आधी शहरातील एकूण 38 अतिधोकादायक वाडे हे पाडण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी पुणे महापालिकेचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी दिली आहे.