संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पुण्याच्या कात्रजमध्ये सराफी दुकानावर दरोड्याचा प्रयत्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे-‘श्री मल्हार ज्वेलर्स` सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. सराफी पेढीचे मालक रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री अकरा वाजता दुचाकीवरून दोघेजण दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आले होते.

तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानातील अलार्म वाजला. त्यामुळे नागरिक सतर्क झाले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणी करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami