पुणे- मराठी वेबसिरीज ‘जक्कल’ ही १९७० च्या दशकात पुण्यात झालेल्या जोशी-अभ्यंकर मालिका हत्याकांडाचा उलगडा करणार आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली, मध्यमवर्गीय कुटुंबातली चार मुले असा निर्घृण गुन्हा करायला लागल्यावर कुठपर्यंत जाऊ शकतात, हे या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळेल. २ सप्टेंबर २०२३ दरम्यान ही मालिका प्रसिद्ध होणार आहे.पुण्यातील या सीरियल मर्डर केसवर आधारित प्रकरणावर नेहमीच वेगवेगळ्या अँगलने चर्चा होत असते.
विवेक वाघ यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या चार वर्षांपासून ते या सीरिजवर काम करत आहेत. याच विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट शोध माहितीपटाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. जिओ स्टुडिओज, शिवम यादव आणि ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रॉडक्शनचे कार्तिकी यादव यांनी या मराठी वेब सिरीजची निर्मिती केली आहे.