पुणे- पुणे- नगर रस्ता मार्गावर वडगाव शेरी परिसरातील सोपान नगरमध्ये स्क्रॅप गोदामाला भिषण आग लागली आहे. गोदामाला अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली यांचे कारण अद्याप समोर आले नाही.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाकडून १५ वाहने दाखल झाली होती. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. तब्बल दोन तासानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या ठिकाणी 3 कुटुंब राहत होती. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूनच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, नाशिकच्या वडनेर दूमाल रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम के फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग लागली.फर्निचर गोदामाला आग लागल्यानंतर आतमध्ये असलेले पंधरा-वीस जण वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.या आगीच मॉलचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.