संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

पुण्यातील साडेचारशे मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरविण्याची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी पुणे शहरातील सुमारे साडेचारशे मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरविण्याची करवाई करावी. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा म्हणत आंदोलन करून, असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. याबाबतचे पत्र पक्षाचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहे.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रानुसार, भोंगा हा सामाजिक विषय आहे व आम्हालाही सामाजिक तेढ निर्माण करायची नाही. मात्र, आम्ही आमच्या भूमिकेपासून फारकत घेऊ शकत नाही. त्यामुळे शहरात सुमारे 400 ते 450 मशिदी अस्तित्वात असून जवळपास सर्व बेकायदेशीरपणे मान्यता न घेता लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते तातडीने काढावेत अन्यथा कायमचे बंद करावेत. तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी मौलवींशी चर्चा करून आम्हाला भोंग्यावरून अजान होणार नाही याचे लेखी आश्‍वासन द्यावे अशी मागणी पत्रात करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami