पुणे – पुण्यात ऍक्सिस बँकेचे एटीएम जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली आहे. बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर परिसरातील या एटीएम मशीनला आग लागली. व्हीआयटी कॉलेज रोड गजानन बुक डेपोसमोर हे एटीएम आहे. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ फायर ब्रिगेडची गाडी याठिकाणी रवाना झाली. संबंधित दुर्घटनेत कोणीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एटीएम मशीनमधील नोटा जळून खाक झाल्या आहेत.

पुण्यात ऍक्सिस बँकेचे एटीएम जळून खाक
- Published on June 20, 2022
- 1:42 pm


- टॅग्स :
- ATM, Axis Bank, maharashtra, pune
