संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

पुण्यात पीएमपीएलच्या प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

पुणे- कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांच्या रूग्णांमध्ये देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुंबईत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच लोकल प्रवास, मॉलमध्ये प्रवेश अशी नियमावली करण्यात आली असतानाच आता पुण्यातही पीएमपीएलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल पासची सक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात वाढत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पीएमपीएल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएलने घेतला आहे. पीएमपीएल प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यात आजपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.बसमधून युनिव्हर्सल पास किंवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami