संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

पुण्यात मध्यरात्री पावसाचे धूमशान दगडूशेठ गणपती मंदिरात पाणी शिरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*बिबवेवाडीत ढगफुटीसदृश पाऊस

पुणे – काल मध्यरात्री पुण्यात परतीच्या पावसाने अक्षरश: हैदास घातला. शहरात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते.रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाचे हे धुमशान पहाटेपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे या मुसळधार पावसाचे पाणी थेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिरले होते. रात्रीत १०४ मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील या धुवाधार पावसामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकूण १२ जणांची सुखरुप सुटका केली.रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटी सारखापाऊस झाला.पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले.दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरले. पावसाच्या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.कोंढवा खुर्द भाजी मंडई,मंगळवार पेठ आणि सदाआनंदनगरमधून साचलेल्या पाण्यातून १२ जणांची सुटका करण्यात आली.आज पहाटे ४ वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकूण २० घटना घडल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami