संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

पुण्यात मानव विरहीत बोटीची यशस्वी चाचणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच गस्त घालण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मानवविरहित सशस्त्र तीन बोटींची यशस्वी चाचणी घेतली. या दूरून नियंत्रित केल्या जाणाऱ्या बोटीची यशस्वी चाचणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने आज पुण्यात केली.गुजरातमधील गांधीनगर येथे 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 12व्या डिफेक्सपो 2022च्या आधी ही चाचणी घेण्यात आली.
डीआरडीओने विकसित केलेल्या या बोटीचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही. शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा या बोटीवरी मानव नसल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राउंड कंट्रोल स्टेशनकडे व्हिडीओ फीड ट्रान्सफर केले जाईल. सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी या बोटींचा वापर केला जाईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करण्यासाठी बोटीवर शस्त्रेही बसवण्यात आली आहेत, अशी माहिती डीआरडीओच्या संशोधन आणि विकास आस्थापनेचे समूह संचालक पी एम नाईक यांनी दिली. भामा-आसखेड धरणावर ही चाचणी घेण्यात आली.तथापि, ही बोट भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात कधी समाविष्ट केली जाईल, याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट केलेली नाही.ही बोट एका वेळी पाण्यात 24 तास सतत गस्त घालू शकते. देशाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूचा, कंट्रोल रूममध्ये बसून एका बटणावर खात्मा करू शकतो. ही बोट पूर्णपणे भारतीय बनावटीची असून सागर डिफेन्स इजिनिअरिंग कंपनीने डीआरडीओसह ती विकसित केली आहे. गेल्या महिन्यात स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहून नौका आयएनएस विक्रांत भारतीय नौसेनेच्या ताफ्यात समाविष्ट झाली. त्यापाठोपाठ ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. आता मानवविरहीत नौकेची चाचणी करण्यात आली. अशारीतीने भारतीय आरमार मजबूत झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami