संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

पुरंदर विमानतळाला पारगावासह 7 गावांतील ग्रामस्थांचा विरोध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पुरंदर विमानतळ जुन्या जागेवर होणार असल्याचे जाहीर करतानाच पारगावासह सातही गावांतील ग्रामस्थांनी विमानतळाच्या प्रकल्पाला जोरदार विरोध केला. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी येथील ग्रामपंचायतींनी पत्रक प्रसिद्ध करत विमानतळाला विरोध असल्याचे सांगितले आहे. या पत्रकात या ग्रामपंचायतींनी सांगितले की, ‘समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनी विकत घेऊन विमानतळ करण्याचा घाट शासनाने घातला आहे. मात्र, कोट्यवधी रुपये मिळाले, तरी शेतकरी प्रकल्पाला जमीन देणार नाहीत`. महाविकास आघाडी सरकारने निश्चित केलेल्या जागेला संरक्षण विभागाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नकार दिला आहे. त्यामुळे सत्तांतर झाल्यानंतर विमानतळ जुन्या जागेवरच करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत. पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेला सर्व परवानग्या मिळाल्या असल्याने जुन्या जागेवरच विमानतळ करणे हिताचे आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami