संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पुलाच्या सदोष डिझाईमुळे अपघात सीटबेल्ट न बांधल्याने मिस्त्रींचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*फॉरेन्सिक पथकाचा निष्कर्ष
मुंबई – मर्सिडीज-बेंझ एसयूव्ही पुलाच्या सदोष डिझाईनमुळे मोटारीला अपघात झाला आणि पाठीमागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळे वेगात असलेल्या कारला अपघात झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष ७ जणांच्या फॉरेन्सिक तपास पथकाने काढला आहे. सीट बेल्ट बांधला असता तर त्यांना किरकोळ खरचटले असते, असे मत या पथकाने व्यक्त केले आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर फॉरेन्सिक पथकाने या अपघाताची आणि मिस्त्री यांच्या मृत्यूची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. आयआयटी कानपूरच्या ७ जणांच्या पथकाने अपघाताबाबत त्यांची मर्सिडीज-बेंझ एसयूव्ही कार आणि इतर बाबींचा तपास केला. त्यात सायरस मिस्त्री यांना झालेल्या जखमा लक्षात घेता हे वाहन अतिशय वेगात होते. सीट बेल्ट बांधला नसल्यामुळे अपघातानंतर ते तेवढ्याच वेगाने आदळले. त्यामुळे मोठ्या जखमा होऊन त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पथकाने काढला. अपघातानंतर कारच्या पुढील एअर बॅग्ज बाहेर आल्या. साईड सुरक्षा पडदेही कार्यरत झाले. परंतु वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने आतील व्यक्तींना गंभीर इजा झाल्या. मोटारीच्या डिझाईनमधील दोषामुळे अपघात झाला. नंतर पुढील एअरबॅग उघडल्या पण इतर सुरक्षा यंत्रणांनी तेवढे काम केले नाही. याशिवाय सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पथकाने काढला. आयआयटी कानपूरच्या तज्ञांचे हे पथक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami