नागपूर – विदर्भात मुबलक वनसंपदा व खनिजसंपदा आहे.आता विदर्भाच्या विपुल खनिज संपत्ती असलेल्या भूगर्भात सोन्याचा साठाही आहे.हा सोन्याचा खजिना शोधण्यासाठी जीएसआय म्हणजेच भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया विदर्भच्या जमिनीचा आत काय दडलंय याचा शोध लावला आहे. त्यांना पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीच्या भूगर्भात सोन्याचे साठा आढळून आला आहे.
याबाबत जीएसआयच्या वैज्ञानिकांनी सविस्तर अहवाल सादर केला होता.हा अहवाल १९८४-८५ मध्ये सादर करण्यात आला होता.अनेक वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर त येथील पुल्लर, परसोरी, थूतानबोरी आणि गडचिरोली येथील भूगर्भातील सर्वेक्षण केले.या सर्वेक्षणात सोन्याचा साठा असल्याची बाब पुढे आली आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात घनदाट जंगल आणि पहाडातही सोन्याचा साठा आहे.
भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील पुलर,परसोरी आणि थूतानबोरी या पट्ट्यात सोन्याच्या असल्याचे वैज्ञानिक यांचे म्हणणे आहे. या परिसरामध्ये अनेक सर्वेक्षण जीएसआय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय भू वैज्ञानिकांनी केले आहे. भूगर्भात सोन्याचा साठा असण्याची शक्यतेने या परिसरातील बहुतांश स्थानिकांनीही आपल्या शेती कधी विकण्याचा विचार केला नाही.