संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले.
तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले. विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami