संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार पृथ्वीराज चव्हाण हे सध्या दिल्लीत आहेत. मात्र महाराष्ट्र कॉंग्रेसमधील सध्याचे वातावरण पाहता त्यांच्या दिल्ली भेटीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र आपण कराडमधील एका महत्वाच्या कामासाठी येथे आलो आहोत. त्यामुळे या भेटीचा कुणीही राजकीय अर्थ कडू नये असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील महिन्यात आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षपद हे कॉंग्रेसच्या कोट्यातील असल्याने कॉंग्रेसकडून या पदासाठी संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यांच्या विरुद्ध पक्षात मोठी नाराजी आहे. स्वतः चव्हाण सुद्धा नानांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे आपल्या दिल्ली भेटीत चव्हाण या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करणार असून कदाचित त्यानंतर नानांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण कराडमधील एका वेगळ्या कामासाठी येथे आलो आहोत, त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami