पॅरिस – कीटकनाशक वापरावरील बंदी उठवण्यासाठी हजारो संतप्त शेतकऱ्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आपले ट्रॅक्टर आंदोलन सुरु ठेवले आहे. आंदोलक शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर अश्रूधूराची नळकांडी फोडली. त्यामुळे पॅरिसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
या मोर्चात 500 ट्रॅक्टर्स घेऊन 2 हजार शेतकरी सहभागी झाले आहेे. ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या घोषणा लिहिल्या आहेत. गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून मात्र या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या काड्या फोडल्या. आंदोलक शेतकरी म्हणाले की, कीटकनाशकांच्या वापरावरील निर्बंध आणि पर्यावरणीय नियमांमुळे यूरोपियन यूनियनमधील सर्वात मोठ्या कृषी उत्पादक क्षेत्राला धक्का पोहोचवला जात आह. तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान देखील होणार आहे.