दिल्ली -कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा धक्का आहे
पीएफ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र या संदर्भातील कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव आज अर्थ मंत्रालयाने फेटाळला. पीएफ सदस्यांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये दरमहा १ हजार रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने दिला होता. या संदर्भात संसदीय समिती आता अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागणार आहे. कामगार मंत्रालय आणि ईपीएफओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाजप खासदार बी. माहताब यांच्या अध्यक्षतेखाली कामगार विषयक संसदीय स्थायी समितीला, ईपीएफ पेन्शन योजनेच्या संचालनाविषयी आणि त्यांच्या निधीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. अधिकाऱ्यांनी समितीला सांगितले कि मासिक पेन्शन मध्ये कोणत्याही वाढीच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाशी अर्थमंत्रालय सहमत नाही.असे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता या बाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्चं अधिकाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. समितीने आपल्या अहवालात सदस्य,विधवा पेन्शनधारक याना देय असलेली किमान मासिक पेन्शन २ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. पण हि मागणी फेटाळण्यात आली असून पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा धक्का आहे.