संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

पेपरफुटीतील आरोपीचा कर्नाटकसह बिहारच्या ४० परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – आरोग्यभरती पेपरफुटी, म्हाडा आणि शिक्षकभरती गैरव्यवहारामध्ये पकडलेल्या काही एजंट्सचा महाराष्ट्रासह कर्नाटक व बिहारमधील परीक्षांतील गैरव्यवहारांत संबंध असल्याचे आढळून आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात एका आरोपीने आपल्या जाळ्यामार्फत कर्नाटक, बिहारमधील ४० परीक्षा केंद्रांमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे.

ही चाळीस केंद्रे आता रडारवर आहेत. पुणे पोलीस यातील एका प्रमुख संशयित आरोपीच्या मागावर आहेत. परीक्षेत छेडछाड करण्यासाठी बिहारमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचीही माहिती असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, अटकेतील काही एजंट १० ते १५ वर्षांपासून अशा गैरव्यवहारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. एका केंद्रात परीक्षार्थींची संख्या २५०, अशा ४० केंद्रांत तब्बल १० हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षा देण्याची क्षमता होती. ही चाळीस केंद्रे संबंधित आरोपीने मॅनेज केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami