पुणे – पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गोपीचंद सानपला पुणे पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली आहे. आरोग्य विभाग गट क पेपर फोडणारा मुख्य एजंटला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. आरोग्य पेपर फुटीतला हा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. गोपीचंद सानप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पेपर फुटीचे प्रकरण सुरू झाल्यापासून पोलीस सानपचा शोध घेत होते. मात्र, तो दोन महिन्यांपासून फरार होता. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी जीवन सानप याचा भाऊ संजय सानप यास तपास पथकाने अटक केल्यानंतर गोपीचंद सानप हा फरार झाला होता. राज्यात जे काही पेपरफुटीचे प्रकरण झाले आहे. त्यात पेपर फोडणाऱ्या टोळीतील जीवन सानप व गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते. त्यातलाच मुख्य सूत्रधार गोपीचंद सानप याला पोलिसांनी आता अटक केली आहे.