लिमा – पेरुमध्ये मोठा राजकीय घडामोड असून महाभियोग प्रस्ताव लावून पेड्रो कैस्टिलो यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन हटवण्यात आले. त्यांच्या जागी उपराष्ट्राध्यक्ष डीना बोलुआर्टे विराजमान झाला असून त्यांचा शपथवधीही पार पडला आहे. डीना पेरुच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या. त्या या पदावर 2026 पर्यंत राहणार आहे.
पेरूच्या संसदमध्ये राष्ट्राध्यक्ष बोलुआर्टे यांना सत्तेतून काढून टाकल्यासाठी महाभियोग प्रस्तावावर मतदान झालेे. 130 सदस्यीय असलेल्या संसदमध्ये या प्रस्तावाच्या बाजूने 101 मते पडली तर बोलुआर्टे यांच्या बाजूने फक्त 6 मते पडली. 10 खासदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. प्रस्तावाच्या बाजूने जास्त मते पडल्याने पेड्रो कैस्टिलो यांना हटवण्यात आले. पेरूच्या संविधान कोर्टाचे प्रमुख फ्रांसिस्को मोरालेस यांनी महाभियोग प्रस्तावाच्या भाषणमध्ये उपराष्ट्राध्यक्ष डीना बोलुआर्टे यांनी राष्ट्राध्यक्षपद ग्रहण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बोलुआर्टे यांनी कैस्टिलो यांचच्या संसद भंगाबाबतचच्या योजनेला फेटाळून लावली.