लिमा – पेरू देशामध्ये एका शक्तिशाली याकू नावाच्या चक्रीवादळानंतर मुसळधार पाऊस कोसळून महापूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.यात शेकडो घरांची पडझड झाली आणि उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे किमान सहा लोकांचा मृत्यू झाला आहे.
या याकू नावाच्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लंबायेक, पिउरा आणि तुंबेससह प्रदेशांना दिलासा देण्यासाठी सरकारने आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल डिफेन्सने शुक्रवारी पहाटे सांगितले की, याकूमुळे आलेल्या पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.”याकू चक्रीवादळ ही एक अतिशय असामान्य घटना आहे. ज्यामुळे उत्तरेकडील भागात पाऊस पडतो,” असे नागरी संरक्षण संचालक सीझर सिएरा यांनी सांगितले.नंतर,संस्थेने सांगितले की यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५८ लोकांचा मृत्यू झाला आहे.राष्ट्राध्यक्ष दिना बोलुअर्टे यांनी शनिवारी उत्तर पेरूच्या काही भागांना भेट दिली.