नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर २७ दिवसांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. नुपूर शर्मा यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा डागाळली असल्याची कबुली एनएसए डोवाल यांनी दिली आहे. ते म्हणाले की, भारताबाबत काही चुकीच्या गोष्टी पसरवण्यात आल्या आहेत ज्या वास्तवापासून दूर आहेत. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आखाती देशांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत आखाती देशांतील लोक भावनिकरित्या दुखावले आहेत.
अजित डोवाल म्हणाले की, आम्हाला त्यांच्याशी बोलून त्यांचे मन वळवण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा लोक एखाद्या गोष्टीशी भावनिकरित्या जोडलेले असतात, तेंव्हा त्यांना चिड येन स्वाभाविक आहे. अशावेळी त्यांचे आपल्याशी वागणेही थोडेसे विसंगत असते, परंतु आम्ही संबंधित लोकांशी संवाद साधला आणि त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत त्यांच्याशी बोलून त्यांचे मन वळवण्याची गरज असल्याचे ते म्हणत आम्ही त्यांना आमची बाजू पटवून देऊ शकलो. पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधानावर आम्ही देशाअंतर्गत व देशाबाहेर ज्यांना ज्यांना भेटतोय त्यांना आमची बाजू पटवून देण्यात यश आले आहे’, असे अजित डोवाल यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. यावेळी शीख धर्मस्थळावरील बॉम्बस्फोट हा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अजित डोवाल म्हणाले की, भारत त्या देशातील अल्पसंख्याकांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही मोठ्या संख्येने शीख बांधवांना व्हिसा दिला असून, विमानसेवा उपलब्ध होताच त्यांना येथे आणले जाईल. आमची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. आम्ही तेथील शीख आणि हिंदूंना आश्वासन दिले आहे की भारत आपल्या वचनबद्धतेशी प्रामाणिक राहील.