संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

पॉलिसीधारकांनो एलआयसी IPOसाठी पॅन अपडेटचा आज शेवटचा दिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एलआयसी पॉलिसीधारक एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीओमध्ये त्यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण आहे. मात्र या राखीव कोट्याचा फायदा घेण्यासाठी त्यांना एलआयसीच्या साइटला भेट देऊन त्यांचा पॅन अपडेट करणे आवश्यक आहे. पॅन अपडेटची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. म्हणजे तुमच्याकडे फक्त आजचा दिवस शिल्लक आहे.

तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर साइटवर त्वरित तुमचा पॅन अपडेट करा. आतापर्यंत LIC च्या साइटवर 70 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे पॅन अपडेट केले आहेत. तसेच भारतातील कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे.

पॅन कार्ड असे लिंक करा

 • सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत https://licindia.in/ या वेबसाईटवर जा.
 • येथे ऑनलाइन पॅन नोंदणीचा ऑप्शन निवडा.
 • या पेजवर proceed या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी पेजवरील proceed या ऑप्शनवर क्लिक करा.
 • तुमचा ईमेल, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक याची माहिती भरा.
 • बॉक्समध्ये captcha कोड टाका.
 • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्याची विनंती करा.
 • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होताच, तो सबमिट करा.
 • सबमिट केल्यानंतर यशस्वी नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल.
 • मग https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या लिंकवर जा.
 • पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन तपशील आणि captcha कोड टाका. नंतर सबमिट वर क्लिक करा
 • पॅन अपडेटबाबत तुम्हाला इथे माहिती दिसेल.
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami