कीव – नाटो देश असलेल्या पोलंडवर रशिया-युक्रेन युद्धादरम्यान क्षेपणास्त्र हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. पोलंडवर हे क्षेपणास्त्र कोणी डागले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युक्रेन सीमेजवळ झालेल्या या जोरदार हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी बाली येथे जी ७ देशांची तातडीची बैठक बोलावली आणि सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हे क्षेपणास्त्र रशियाने डागले नव्हते.पोलंडवरील क्षेपणास्त्र हल्ल्याची नाटो देशांनी चौकशी सुरू केली आहे.
रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नाटोनेही आपत्कालीन शिखर परिषद बोलावली आहे. दुसरीकडे रशियाने पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा फेटाळून लावला आहे. आता जग तिसर्या महायुद्धाकडे जात आहे की काय, असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर जबर हल्ला सुरू केला तेव्हापासून जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे. आता रशियाचे युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले होत असताना पाश्चात्य देशांसोबतचा त्यांचा तणाव सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत हे युद्ध युरोपच्या इतर भागांमध्येही भडकण्याची भीती अनेक विश्लेषक व्यक्त करत आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे की संघर्ष वाढल्यास युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात रक्तरंजित संघर्ष होऊ शकतो. मात्र तज्ञ म्हणतात की तिसऱ्या महायुद्धाची शक्यता फारच कमी आहे.
तीव्र संघर्ष झाला तर हजारो नागरिकांचा मृत्यू होईल आणि युरोपमध्ये लाखो नागरिकांवर निर्वासित होण्याचे संकट निर्माण होईल. युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत रशियाच्या 50,000 हून अधिक सैनिकांचा बळी गेल्याचा अंदाज पाश्चात्य देशांनी व्यक्त केला आहे. पुतिन यांची प्रकृती ढासळत चालली आहे.हताश होऊन ते युक्रेनमध्ये अणुबॉम्ब वापरण्याची शक्यता आहे. पुतिन यांनी अणुबॉम्बचा वापर केला, तर युक्रेनच्या मित्र राष्ट्रांचे परिस्थितीबद्दलचे मत बदलू शकते.असा वृत्त आहे.