पुणे – भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. आज भाजपने पोलिसांचा बंदोबस्त झुगारून पुणे महापालिकेच्या ज्या पायरीवरून सोमय्या पडले होते, त्याच पायरीवर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शिवसेना आणि महा विकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दरम्यान सत्काराला उत्तर देताना किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले होते.उद्धव ठाकरेच्या गुंडांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण मी गप्प बसणार नाही.शिवसेना नेते संजय राऊत यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच असा निर्धार व्यक्त केला.
आठ दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या पुण्यात आले होते. त्यांनी संजय राऊतयांच्या एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर ते पुण्यातील कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी पालिकेत आले होते. यावेळी तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी त्यांना एक निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुकी केली. यात सोमय्या पालिका प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाय घसरून पडले. सोमय्यांच्या त्यांच्या हाताला आणि पाठीला मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा पुणे महापालिकेत ज्या पायरीवर ते पडले होते तिथे सत्कार आयोजित करण्याचा निर्णय घेतला. होता. त्यासाठी आज पुण्य पुणे महापालिकेसमोर भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने जमले होते . मात्र पुणे पोलिसांनी या सत्काराला परवानगी नाकारली आणि सोमय्यांचा सत्कार इथे न करता दुसरीकडे बंद सभागृहात करावा असे भाजपचे शहर अध्यक्ष मुलीक यांना सांगितले. मात्र मुलीक आणि त्यांचे कार्यकर्ते काहीही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सोमय्यांचा सत्कार जिथे पडले होते तिथेच करण्याचा हट् धरला.
आज दुपारी सोमाय्या पुणे महापालिकेच्या प्रांगणात येताच त्यांना पोलिसांनी अडवले.तेव्हा पालिका आयुक्तांना निवेदन द्यायचे आहे असे सोमय्यांनी पोलिसांना सांगितले त्यावर पोलिसांनी तुम्ही आणि तुमच्या सोबत काही नगरसेवक आत जाऊ शकता असे सोम्य्याना सांगितले. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेथे पोलीस आणि भाजपा कार्यकर्ते यांची रेटारेटी सुरु झाली. त्यामुळे सोमय्या आपली गाडी घेऊन बाहेर गेले आणि भाजपा कार्यालयाजवळ गाडी पार्क करून शहर अध्यक्ष मुलीक यांच्यासह पुन्हा पालिकेजवळ चालत आले यावेळी त्यांना आत घेण्यासाठी पोलिसांना गेट उघडावे लागले आणि त्याचाच फायदा घेत भाजपचे सर्व कार्यकर्ते आत आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त झुगारून कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी पायर्यांवर ठाण मांडून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ वाढला त्याच गोंधळात सोमय्या आत गेले आणि पालिका आयुक्तांना निवेदन देऊन परत आल्यावर ज्या पायरीवरून ते पडले होते त्याच पायरीवर शहर अध्यक्षांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि हे सर्व पोलीस हतबलपणे पाहत होते. तर भाजपने पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले कि ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या कंत्राटदाराचे नाव जाहीर करावे . असे मी आव्हान केले होते. पण त्यांनी नाव जाहीर केले नाही त्यामुळे मी नाव जाहीर करतो, हा कंत्राटदार केईएम हॉस्पिटलच्या मागे चहा विकणारा आहे.आणि त्याचे चार पार्टनर आहेत त्याची चौकशी व्हायलाच हवी पालिका आयुक्तांनी आज मान्य केलेय कि कोविड सेंटर मध्ये घोटाळा झालाय .मी हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,असे त्यांनी सांगितले .तर शहराध्यक्ष मुलीक म्हणाले की किरीटभाई महाविकास आघाडी मधल्या लोकांचे घोटाळे बाहेर काढीत आहेत, म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. विरोधकांचा आवाज दाबला जातोय. सोमय्या यांच्यावरच्या हल्ल्याचा पुणेकरांना प्रचंड संताप आहे. म्हणूनच मोठ्या संखेने पुणेकर येथे जमले आहेत. आणि हा कार्यक्रम म्हणजे त्यांना एक चपराक आहे.असेही मुलीक यांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर सेना भाजपातील संघर्ष आणखी वाढणार आहे.