पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाचा विनयभंग; मदतीसाठी नियंत्रण कक्षाला फोन करण्याची पाळी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

चंडीगड – देशात महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढत चालली असून आता महिला पोलीसही पोलीस ठाण्यात सुरक्षित नाहीत. पोलीस ठाण्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना एका मजुराने थेट त्या पोलीस ठाण्यातील महिलेचा विनयभंग केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पोलीस कर्मचारी महिलेला मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करावा लागला आणि तिथून जेव्हा पोलीस आले तेव्हा त्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली.

चंदिगढ येथील एका पोलीस ठाण्याच्या रिपेरिंगचे काम सुरु होते. या कामासाठी तेथे काही मजूर आले होते. यातील एका तरुण मजुराने पोलीस ठाण्यातील महिला पोलिसाकडे पाहून अश्लील हातवारे केले. या प्रकरणी सदर महिलेने आपल्या वरिष्ठांना सांगण्या एवजी सरळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. त्यानंतर नियंत्रण कक्षातून पोलीस आले आणि त्यांनी या प्रकरणी मोनू नावाच्या त्या आरोपीला अटक केली. दरम्यान या घटनेची माहिती त्या पोलीस महिलेच्या पतीला मिळताच त्यानेही चौकशी करून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान अशा घटनांबाबत या पोलीस ठाण्यातील पोलीस महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्यानेच त्या महिलेने सरळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून तिथून मदत मागितली. मात्र या घटनेने महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस किती दक्ष आहेत ते दिसून आले. जर पोलीस ठाण्यातील महिलेला मदतीसाठी नियंत्रण कक्षाला फोन करावा लागत असेल, तर इतर महिलांच्या बाबतीत काय होत असेल असा सवाल काही महिलांनी केला आहे.

Close Bitnami banner
Bitnami