संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही- उच्च न्यायालय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – खरे तर पोलीस ठाण्यात छळवणूक झाल्याच्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत.पोलीस यंत्रणा निष्कारण ताब्यात घेऊन त्रास देते,अशा तक्रारी अनेकांच्या असतात.मात्र त्यांच्या तक्रारीला पुष्टी देणारा पुरावा हाती नसतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारी बेदखल राहतात.आता याच पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही,असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. सरकारी गोपनीयता कायद्याच्या अंतर्गत निषिद्ध ठिकाणांमध्ये पोलीस ठाणे मोडत नाही,असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
यासंदर्भात मार्च २०२८ मध्ये पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी रवींद्र उपाध्याय नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी गोपनीयता कायद्यांतर्गत या कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.मात्र यंदाच्या जुलै महिन्यात तो गुन्हा रद्द करण्यात आला होता.या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर उच्च न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.त्याची गंभीर दखल न्यायमूर्ती मनीषा पीटाळे आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेजेस यांच्या खंडपीठाने घेतली.पोलीस ठाण्याचा सरकारी गोपनीयता कायद्याखाली निश्चित केलेल्या निश्चित ठिकाणांमध्ये समावेशच होत नाही.त्यामुळे पोलीस ठाण्यात केले गेलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग गुन्हा म्हणता येणार नाही,असे खंडपीठाने आपल्या निकाल पत्रात नमूद केले आहे. नागपूर खंडपीठाने सरकारी गोपनीयता कायद्यामधील कलम तीन आणि दोन(आठ) या कलमांचा हवाला दिला आहे. ही दोन्ही कलमे निषिद्ध ठिकाणी हेरगिरी करण्याशी संबंधित आहेत. दोन्ही कलमांचा विचार करता अर्जदार रवींद्र उपाध्यायविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा वैध मानता येणार नाही, असेही नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान,पोलीस तक्रारीनुसार उपाध्याय हा त्याच्या शेजाऱ्यासोबत झालेल्या वादात पत्नीसह वर्धा पोलीस ठाण्यात गेला होता.त्यावेळी त्याने तक्रार नोंदवतानाच पोलीस ठाण्यातील चर्चेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत नंतर आरोपपत्रही दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही कारवाई चुकीची ठरवत अर्जदार रवींद्र उपाध्यायला मोठा दिलासा दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami