वाशीम – बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे 12 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 593 कोटींच्या विकास कामाचे भूमीपूजन होणार आहे. समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आणि 135 फुटी सेवाध्वजाची स्थापना होणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो बंजारा बांधव उपस्थित राहणार आहेत.
पोहरादेवीच्या विकासाकामासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात मोछ्या निधी घोषित केला आहे. पोहरादेवी येथे येणाऱ्या देशभरातील भाविकांना सुविधा मिळाव्यात या करता हा विकास निधी खर्च केला जाणार आहे. पोहरादेवी इथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. याठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण बंजारा बांधवांचे दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविक पोहरादेवी या ठिकाणी दाखल होत असतात.