ठाणे – बोगस एफएसआय आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात सध्या अटकेत असलेले प्रवीण राऊत यांच्या एक हजार कोटीच्या बेनामी संपत्तीची चौकशी करण्यासाठी काल इडीने वसई विरारसह रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी छापे टाकले. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असल्याने या व्यवहारात संजय राऊत यांची काही लिंक सापडते आहे का याचा ईडी शोध घेत आहे आणि त्यासाठीच हे छापे टाकण्यात आलेत.
आज सकाळी दिल्ली ईडीचे ३० सदस्यांचे एक पथक महाराष्ट्रात आले आणि त्यांनी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन रायगड, ठाणे आणि वाशी विरारमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात प्रवीण राऊत यांच्या रायगडमधील १ हजार कोटींच्या बेनामी संपत्तीची चौकशी सुरु आहे. प्रवीण राऊत यांनी २०१५ मध्ये पर्ल इन्व्हेस्टमेंट या बंदी घालण्यात आलेल्या गुंतवणूकदार कंपनीकडून एक हजार कोटी घेतले होते आणि या रकमेतून रायगडमध्ये दुसऱ्याच्या नावाने जमीन खरेदी केली होती. पर्लसारख्या फ्रोड कंपनीकडून घेण्यात आलेल्या याच पैशांची ईडीने सध्या अटकेत असलेल्या प्रवीण राऊतकडे चौकशी केली असता त्यांनी रायगडमधील जमिनीची माहिती दिली. त्यामुळे या जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित असलेल्या लोकांवर आज ईडीने छापे टाकले. तसेच या व्यवहारात शिवसेना नेते संजय राऊत यांची काही लिंक मिळतेय का याचा ईडी शोध घेत आहे.
गोरेगावमधील प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरु आशिष कंस्ट्रक्शनचे संचालक असून पालघर जिल्ह्यातील रियल इस्टेट व्यवसायात त्यांचे मोठे नाव आहे. मात्र गोरेगाव येथील एका भूखंडाच्या बोगस एफएसआय प्रकरणात तसेच मनी लॉन्डरिंगमध्ये त्यांना इडीने अटक केली होती. शिवाय पीएमसी बँक घोटाळ्यामध्येही त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या पत्नी माधुरी राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांचे व्यवसायिक संबंध असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले असून २०१० मध्ये वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्याकडून ५५ लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी चौकशीही झाली होती आणि म्हणूनच आताच्या धाडीत प्रवीण राऊत यांची जी १ हजार कोटींची बेनामी संपत्ती उघडकीस आली आहे त्यात संजय राऊत यांची काही इन्व्हॉलमेंट आहे का याचा ईडी तपास करीत आहे.