संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

प्रसाद ओकच्या ‘माझा आनंद’ पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : धाक,आदरयुक्त दरारा,समोरच्याच्या उरात धडकी भरवणारी नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या मराठी चित्रपटाने एक वेगळाच इतिहास घडवला. प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आनंद दिघे ही प्रसाद ओक यांनी साकारलेली व्यक्तिरेखा काळजाला भिडली. प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सुपरहिट झाला. प्रसाद ओक यांचा अभिनय इतका हुबेहूब होता की, चित्रपटानंतर कार्यकर्ता असावा तर असा, असे शब्द बाहेर पडले. कारण आनंद दिघे हे समाजासाठी, त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढणार नेतृत्व प्रसाद ओक यांनी त्यांच्या अभिनयातून यशस्वीपणे त्या-त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले दिसते. म्हणूनच प्रसाद ओक यांनी या अभिनयासाठी, व्यक्तिरेखेसाठी कशी तयारी केली. त्यांच्या एकूणच या प्रवासावर त्यांनी ‘माझा आनंद’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
विशेषतः ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. प्रसाद ओक यांनी साकारलेला आनंद दिघे प्रत्येक मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला. म्हणूच एक अभिनेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास आता सर्वांना जाणून घेता येणार आहे. प्रसाद ओक यांनी या भूमिकेसाठी कशी तयारी केली, त्याची मेहनत, त्यांना आलेले अनुभव या त्यांच्या प्रवासावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ असे या पुस्तकाचे नाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रसाद ओक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विविध फोटोही पोस्ट केले आहेत. यातील काही फोटोत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल माहिती देताना दिसत आहेत. या पुस्तकात राजकारण्यांचा किंवा राजकारण आलेले नाही. केवळ एका कलाकाराने भूमिका साकारतानाच्या प्रवासावर लिहिलेले हे पुस्तक आहे, असे प्रसाद ओक यांनी स्पषट केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे केले जाणार आहे. या पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे. प्रज्ञा पोवळे यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केले आहे. तर सचिन गुरव यांनी याचे अक्षर सुलेखन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami