मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पार्श्वगायक जुबिन नौटियाल यांचा गुरुवारी घरातीलच जिन्यावरून पडून अपघात झाला. जुबिन नौटियाल त्याच्या घराच्या जिन्यांवरून पडला होता, त्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुबिन नौटियाल हे त्यांच्या घरातील पायऱ्यांवरून पडले आणि त्यांना हा अपघात झाला आहे. मात्र यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या बरगड्यांनाही मर लागला आहे. याशिवाय जुबिनच्या डोक्यावर आणि कपाळावर खोल जखम झाली आहे. या घटनेनंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर जुबिन नौटियाल यांच्या उजव्या हातावर आता शस्त्रक्रिया होणार असल्याचे समजते. डॉक्टरांनी त्याला उजवा हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांकडून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. तसेच झुबिनचे चाहते त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सतत पोस्ट करत आहेत.